पुणे, २८/०४/२०२३: पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर नागरिक / पर्यटकांना घडविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ हि बससेवा दि. ०३/०८/२०१९ पासून सरू करण्यात आली होती, सदर बस सेवेकरिता प्रवाशी, नागरिक, पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सदरील बससेवा स्थगित ठेवण्यात आली होती.
सध्या ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सुरु करणेबाबत प्रवाशी, नागरिक, पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुन्हा ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा हि दि. ०१/०५/२०२३ रोजी पासून २ वातानुकुलीत बसेसद्वारे पूर्ववत सुरु करण्यात येत आहे.
निगडी (भक्ती शक्ती) बसस्थानक येथून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सकाळी ०९:०० वाजता सुरु होईल.
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची माहिती खालीलप्रमाणे
.
ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची नावे
१ भक्ती शक्ती उद्यान (रनिंग)
२ प्रतिशिर्डी शिरगांव
३ देहुगांव (मुख्य मंदिर)
४ देहू गाथा मंदिर
५ बर्ड व्हॅली
६ सायन्स पार्क
७ चाफेकर बंधू स्मारक (रनिंग)
८ श्री. मोरया गोसावी मंदिर
९ मंगलमुर्ती वाडा
१० चाफेकर वाडा
११ इस्कॉन मंदिर
१२ अप्पूघर / दुर्गा टेकडी
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी रक्कम रु. ५००/- तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे.
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
वेळे अभावी पर्यटन स्थळ / ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
सदर बसची वेळ सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०७:१५ अशी राहील.
More Stories
पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदान जनजागृती
चिंचवडमध्ये भाजप उमेदवार बदलणार, जगताप कुटुंबाचा मोठा निर्णय
पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन