October 3, 2024

पीएमडीटीए जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत प्रज्ञेश शेळके, अरोही देशमुख यांना विजेतेपद

पुणे, 8 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए – 14, 17 वर्षाखालील मुले, मुली, पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अव्वल मानांकीत प्रज्ञेश शेळके व अरोही देशमुख यांनी आपापाल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असेलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपदाच्या लढतीत अव्वल मानांकीत प्रज्ञेश शेळकेने नवव्या मानांकीत समिहन देशमुखचा 4-2, 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रज्ञेश मिलेनियम स्कूल येथे नवव्या इयत्तेत शिकत असून मिलेनियम टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक अदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 
 
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत आरोही देशमुखने चौथ्या मानांकीत वीरा हारपुडेचा 4-1, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. आरोही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल येथे आठवी इयत्तेत शिकत असून ऐम टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
 
दोन्ही गटातील पात्र ठरलेले चार खेळाडू 16 ते 18 मे दरम्यान कोल्हापूर येथे होणा-या 14 वर्षाखालील राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिपन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.   
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- 14 वर्षाखालील मुले
प्रज्ञेश शेळके(1) वि.वि समिहन देशमुख(9) 4-2, 4-2;
नमिश हुड वि.वि वैष्णव रानवडे 4-1, 4-1;
अंतिम फेरी- प्रज्ञेश शेळके(1) वि.वि नमिश हुड  5-4(1) 4-2;
3रे व 4थे स्थान- समिहन देशमुख(9) वि.वि वैष्णव रानवडे 10-8;
 
मुली- उपांत्य फेरी
आरोही देशमुख(1) वि.वि सारा फेंगसे(3) 4-0,4-0;
वीरा हारपुडे(4) वि.वि तनया देशपांडे 4-0,4-0;
अंतिम फेरी- आरोही देशमुख(1) वि.वि वीरा हारपुडे(4) 4-1, 4-1;
3रे व 4थे स्थान- सारा फेंगसे(3) वि.वि तनया देशपांडे 10-4.