June 14, 2024

पुणे: ससून च्या इमारतीवरून उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या, एमबीबीएसच्या पथमवर्गात घेत होती शिक्षण

पुणे, २९/०३/२०२३: परिक्षेचा अभ्यास न झाल्याने आलेल्या नैराश्यातून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या तरूणीने ससून रूग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला तात्काळ उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

अदिती दलभंजन (20, रा. आनंदनगर, सिंहगडरोड) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थीनेचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अदि तीने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बीजे मेडीकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु, तिच्या कॉलेजच्या परिक्षेचा अभ्यास न झाल्याने तीला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तीने वडीलांना याची कल्पना देखील दिली होती. बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तीने ससून रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

“अदितीला नेहमीप्रमाणे कॉलेजला आल्यानंतर तिने साडेदहा वाजण्याच्या सुमारास ससून रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.” – संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे.