पुणे, ०४/०५/२०२३: मैत्रिणीने दुसर्या मैत्रिणीला कर्ज काढायला भाग पाडून कर्जाचे हप्ते न फेडला तब्बल ६९ लाखाला गंडा घातला आहे. पिडीत मैत्रीणीला दर महिण्याला १ लाख ७० हजाराचा कर्जाचा हप्ता पडत आहे. तीने काही कर्जाचे हप्ते कसेबसे फेडले. मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने ती मैत्रणीकडे, तीच्या आई वडिलांकडे आणि बहिणीकडेही दाद मागण्यास गेली. मात्र तीला मैत्रीणीच्या आई-वडिलांनी मारहाण केली तर बहिणीने संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणी शशीकांत लोणकर (३४), शशीकांत वसंत लोणकर (५६), समिधा शशिकांत लोणकर, ऋतीका लोणकर, सुशिल लोणकर, उत्तम शेळके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्या नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिलेची कल्याणी ही मैत्रणी असून एकाच सोसायटीत दोघी रहायच्या. कल्याणीने फिर्यादीला माझे वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे. मी खुप अडचणीत येत आहे. मला तातडीने ५० ते ६० लाखांची गरज असून मला आर्थिक मदत कर. मी कर्जाचा हप्ता नियमीत भरत जाईल तगादा लावला होता. पिडीतेने सुरवातीला इतके कर्ज मिळणे शक्य नसल्याचे सांगीतले होते. मात्र कल्याणीने उत्तम शेळके हा नॅशनल बॅकांचा सेलींग एजंट असल्याचे सांगत त्याला कागदपत्रे देण्यास भाग पाडून तब्बल ८० लाखाचे कर्ज पिडीतेच्या नावावर काढले. यातील ४८ लाख ४ हजार रुपये कल्याणीने फेडले.
उरलेले पैसे देत नसल्याने पिडीतेचे हप्ते थकत गेले. फिर्यादींनी राहिलेले पैसे परत माहितले असता, त्यांना धमकाविण्यात आले. याबाबत फिर्यादींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करत आहेत.
More Stories
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफीचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील सर्व सोसायट्यांचा वीजपुरवठा पूर्ववत
‘नृत्यसाधकांनी पूरक विज्ञानमितीही शोधाव्यात’, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे आवाहन