September 9, 2024

पुणे: मैत्रीणीला शिवीगाळ केल्याचा आरोप करुन तरुणावर शस्त्राने वार, कर्वेनगर भागातील घटना

पुणे, ०५/०६/२०२३: मैत्रीणीला शिवीगाळ केल्याचा आरोप करुन तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार सुनील जाधव (वय २४, रा. समता सोसायटी, वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी जय सपकाळ आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार जाधव याने याबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार आणि त्याचा मित्र कर्वेनगर परिसरातील कर्लिज कॅफेत मध्यरात्री काॅफी पिण्यासाठी गेले होेते. काॅफी पिऊन ते बाहेर पडले. तेव्हा जय सपकाळ, त्याच्याबरोबर असलेली एक तरुणी आणि साथीदार तेथे आले. तू मला शिवीगाळ केली का, अशी विचारणा तरुणीने ओंकारला केली. तेव्हा ओंकारने तरुणीला शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले.

कारणावरुन जय सपकाळ आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी ओंकारशी वाद घातला. ओंकारच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.