पुणे, २४/०६/२०२३: महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्याच्या गुन्ह्यात (मोक्का) तब्बल सहा महिन्यापासून फरार असलेल्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
साकिब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान (23, रा. लुनिया बिल्डींग, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. तेव्हा पासून पोलिस साकिबचा शोध घेत होते. परंतु, तो अस्तित्व लपवुन वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ओळख व ठाव ठिकाणा बदलुन राहत होता. तो व त्याची टोळी कात्रज आणि संतोषनगर परिसरात स्वतःचे टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याची माहिती काढत असताना अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना साकिबची माहिती मिळाली होती. तो निरा येथे लपल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेऊन पुढीत तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त नारयण शिरगावकर यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सागर भोसले, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.