पुणे, दि. १६/०३/२०२३- घरफोडीच्या गुन्ह्यात मागील १० वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याला नांदेडमधून ताब्यात घेउन पथकाने अटक केली. भिमराव उर्फ भिम मारोती बोंडळवाड (वय-३८, रा.बेटमोगरा,ता.मुखेड, जि. नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करुन मागील दहा वर्षापासून भिमराव बोंडळवाड पसार झाला होता. संबंधित गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी मूळगावी नांदेडमध्ये आल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने नांदेडमध्ये जाउन त्याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी बजरंग देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे, एपीआय संदिप जोरे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील हेमंत झुरंगे,दिपक कांबळे यांनी केली.
More Stories
Pune: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला ‘प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी उड्डाणपूल’ असे नाव द्यावे
धानोरी-चऱ्होली डी.पी. रस्त्यास वनविभागाची मंजुरी; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश
पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार