June 14, 2024

पुणे: जुगार अड्डयावर छापा, १६ जणांविरुद्ध कारण

पुणे, दि. १६/०३/२०२३:  येरवडा परीसरात  बेकायदेशीरपणे मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याठिकाणी २० हजारांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम१२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येरवडा परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने पाळत ठेवुन छापा टाकला असता, काहीजण बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत असल्याचे मिळुन आले. पथकाने १६ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून जुगारातील रोकड आणि साहित्य असा २० हजारांचा ऐवज जप्त केला. १६ जणांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम१२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  भरत जाधव, एपीआय अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांनी केली