September 17, 2024

पुणे: उरळी कांचनमध्ये २ हजार ७५० गावठी दारु नष्ट सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे, दि. २८/०२/२०२३ – उरळी कांचन परिसरात  गावठी हातभट्टी दारूचा साठा करीत विक्री करणार्‍याविरुद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. त्याठिकाणावरील तब्बल २ हजार ७५० लीटर दारुसाठा नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरळी कांचन परिसरातील  शिंदेवणे काळेश्वर गाव, राठोड वस्तीवर गावठी हातभट्टी दारु विकत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ३ लाख २ हजारांचा २ हजार ७५० लीटर गावठी दारूसाठा नष्ट केला.  तीन आरोपी विरूध्द  महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही   कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,  सहआयुक्त संदिप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव , सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे,  राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अमित जमदाडे यांनी केली.