July 22, 2024

पुणे: थेउर फाटा परिसरात ट्रकच्या धडकेत पादचारी जेष्ठ महिला ठार

पुणे, दि. ०२/०७/२०२३: भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठ महिला ठार झाली. हा अपघात ३० जूनला दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुणे- सोलापूर रस्त्यावरील थेउर फाटा परिसरात घडली.

दगडबाई बाळू खुपसे (वय ६५,रा. साष्टे, कोलवडी, हवेली ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नाना सुखदेव कावरे (वय ३५, रा. सिद्धेश्वरवाडी पारनेर, नगर) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडबाई ३० जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास थेउर फाटा परिसरातून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील ट्रकचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या दगडबाई यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.