December 14, 2024

पुणे: कुंजीरवाडीत वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पुणे, दि. ०२/०७/२०२३: भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना ३० जूनला पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीत घडली. अपघातात ठार झालेल्या पादचार्‍याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अमलदार घनश्याम आडके यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी परिसरातून पादचारी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.