July 27, 2024

पुणे: आयपीएस अधिकाऱ्याने महिलेकडे केली लैंगिक सुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे, दि.०५/०५/२०२३: सोशल मीडियाच्या आधारे आयपीएस अधिकाऱ्याने एका विधवा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित आयपीएस अधिकाऱ्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएस अधिकारी निलेश अशोक अष्टेकर (आंबेगाव बु, भारती विद्यापीठ) याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अष्टेकर स्टेट इंटेलिजेन्स डिपार्टमेंट (एसआयडी) पुण्यात कार्यरत आहे. फेसबुक मेसेंजरवर अष्टेकरने महिलेला मेसेज करुन ओळख वाढवली. यानंतर त्याने पुण्यात आयपीएस अधिकारी असून पोलीस भरतीचे काम करत असल्याचे सांगितले. माझी ओळख असल्याने तुला पोलीस भरती व्हायचे का ? अशी विचारणा केली. पिडीतेने तीच्या बहिणीचा मुलाला पोलीस भरती करायचे आहे, मात्र तो नापास झाला असल्याचे सांगितले. यावर अष्टेकरने त्याला भरती करतो असे म्हणत मेसेंजरवर पिडीतेचा मोबाईल नंबर घेतला.

तो व्हॉटस अप मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लैंगिक सुखाची मागणी करु लागला. यानंतर त्याने नग्न व्हिडिओ कॉलही केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत आहेत.