धायरी, 05 मे 2023: पुणे -मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवीन कात्रज बोगदा ते मुठा नदी पुला पर्यंत सतत होणारे अपघात रोखण्यासाठी या परिसरात विविध उपाय योजना करून झिरो अपघात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी नवीन कात्रज बोगदा परिसरात वाहन तपासणी नाका उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार व जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांच्या हस्ते या तपासणी नाक्याचे उद्घाटन करण्यात आले.
अप्पर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखेचे विजयकुमार मगर,राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य प्रबंधक संजय कदम,रिलायन्स चे महाव्यवस्थापक अमित भाटिया, सहाय्यक पोलीस आयुक्त मौला सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, पांडुरंग वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

More Stories
Pune: शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Pune: अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा- मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
Pune: एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन