पुणे, २५/०३/२०२३: व्यवसायिकाला कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून, त्यास गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याची सुमारे दोन कोटीं रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपी संचालक हा त्याचे कार्यालय बंद करुन दुबईला पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
याबाबत शिवणे येथील ३६ वर्षीय एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत रमेश पाटील(वय २५, रा. मोराळे (राजापूर), पलूस, सांगली), संतोषकुमार विष्णु गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील प्रभात रोडवरील कार्यालयात २० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीची व्यावसायिक स्थिती चांगली असल्याचे पाहून आरोपी संतोषकुमार गायकवाड याने त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपला फॉरेक्स, ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून बेस्ट पॉईट इम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग या नावाने कंपनी असल्याचे सांगितले. सदर कंपनीचे प्रभात रोडवर कार्यालय असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या आग्रहामुळे तसेच इतर लोकांना दरमहा ५ ते ६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचे त्याने दाखवले.त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला एक कोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर पुन्हा २४ ऑगस्ट २०२१ ला ८० लाख रुपये रोख दिले. याबाबत आरोपी संतोषकुमार गायकवाड याने समजुतीचा करारनामा लेखी स्वरूपात करुन दिला. मार्च २०२२ मध्ये तुम्हाला देण्यात येणार्या नफ्याच्या रक्कमेचा आपण संपूर्ण हिशेब करुन ती सहा टक्के दराने येणारी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही आणखी दुसरी गुंतवणूक सुरु करा म्हणजे मार्च महिन्यात तुमचा आणखी फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर तो दुबईला अचानक गेला.
५० लाख नफा मिळणार आमिष
दुबई वरू मार्च २०२२ मधील पहिल्या आठवड्यात संतोषकुमार गायकवाड पुण्यात आला.त्यानंतर तक्रारदार यांच्या परताव्याच्या रक्कमेचा हिशेब करुन तुम्हाला सुमारे ५० लाख रुपये नफा मिळणार आहे असे सांगितले. त्यानंतर आणखी २० लाख रुपये द्या म्हणजे तुमची गुंतवणुक अडीच कोटी रुपये होईल, असे आरोपीने सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आणखी २० लाख रुपये रोख प्रभात रोडच्या कार्यालयात नेऊन आरोपीस दिले. त्यानंतर आरोपी अचानक दुबईला निघून गेला. तक्रारदार महिलेच्या पतीने त्यास अनेकदा फोन केले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि फोन घेणे बंद केले. प्रभात रोडवरील कार्यालय सुद्धा बंद केले. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखा एक पथकाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर करीत आहेत.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान