ज्योतिराम फुलचंद माळी (वय ४०, दिघी उप डाकघर पोस्ट मास्टर), भगवान श्रीरंग नाईक (वय ३६, क्लार्क), गणेश तानाजी लांडे (वय ३७, धानोरी पोस्ट मास्टर), मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय ५१, धानोरी पोस्ट मास्टर) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तर रमेश गुलाब भोसले, विलास एच देठे यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश नानासाहेब वीर (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दिघी कॅम्पमध्ये आलेल्या एकूण २४७ टाइम डिपॉझिट खातेदारांच्या ९ कोटी ६२ लाख ९८ हजार रूपये रक्कम स्वीकारून त्यांचे धानोरी येथील शाखाडाक घरात टीडी खाते उघडण्यास लावून या रक्कमेपोटी एकूण १८ लाख ३५ रुपये धानोरी डाकघरास देऊन ही रक्कम आपापसात वाटून घेत डाक खात्याची आणि टीडी खातेदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बनावट सह्या करून पोस्ट खात्याची फसवणूक केली.
शाखा डाकपाल ९ बीआरडी, यानी डंकर्क लाईन मध्ये आलेल्या एकुण ५९ TD गुंतवणुकदारांची एकुण २ कोटी ४० लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम स्विकारुन ही ९ बीआरडी डाकघरामध्ये TD खाते उपडण्यास लावून त्या रक्कमेपोटी एकूण कमिशन रक्कम ४ लाख ९५ हजार २०० रुपये पैकी ७५ टक्के रक्कम आरोपी कोळीने स्वतः घेवुन २५ टक्के रक्कम ही ९ बीआरडी शाखा डाकपाल यांनी आपआपसात वाटुन घेवून डाकयात्याची आणि TD वातेदारांचा विश्वास संपादन करून त्यांचे बनावट सहया करून भारतीय पोस्ट बात्याची फसवणुक केली.
More Stories
महाबँक कर्मचार्यांचे धरणे आंदोलन : विविध मागण्यांसाठी २० मार्च रोजी देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत