April 28, 2024

पुणे: मौजमजा करण्यासाठी नागरिकांची फसवणूक, ४३ लाखांची ७ वाहने जप्त

पुणे, दि ४/०९/२०२३: मौजमजा करण्यासाठी मोटार मालकांची फसवणूक करणार्‍याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. त्याच्याकडून ४३ लाख रुपये किमतीची ७ वाहने जप्त केली आहेत. सयाजी ज्ञानदेव पाटील (वय-३५ रा. मानाजीनगर, नर्‍हे, पुणे मुळ रा. अमनापुर ता. पलूस, जि. सांगली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कंपनीत मोटार दर महिना ५० हजार रुपये भाडे तत्वावर लावून देण्याचे सांगून आरोपी मोटार मालकांची फसवणूक केली होती. सिंहगड पोलीस आणि युनीट तीन समांतर तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चत्ते यांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सयाजी पाटील याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मौज मजेसाठी गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील राहुल पवार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते यांनी केली.