October 14, 2024

पुणे: संगणक अभियंता तरुणीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत

पुणे, ९/०४/२०२३: संगणक अभियंता तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली.अजिंक्य रमेश सावंत (वय २६, रा. मेघवाडी, लालबाग, लोअर परळ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संगणक अभियंता तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणी खराडीतील  माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. तिघींनी मुंढव्यातील केशवनगर परिसरातील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्वावर घेतली आहे. आरोपी अजिंक्य सावंतचे तक्रारदार तरुणीच्या एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत.अजिंक्य मैत्रिणीला भेटायला मुंबईहून पुण्यात आला होता. तक्रारदार तरुणी सकाळी गाढ झोपेत होती. त्या वेळी अजिंक्यने तरुणीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला जाग आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. अजिंक्यच्या मैत्रिणीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने मैत्रीणाला मारहाण केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. आरोपी अजिंक्य याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करत आहेत.
—-