October 14, 2024

पुणे: अघोरी विद्येसाठी सुनेचे मासिक पाळीतील रक्त बाटतील साठविले; पती, सासू-सासर्‍यासह इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

 पुणे, दि. १०/०३/२०२३: अघोरी विद्या करण्यासाठी कुटूंबियांनी सुनेची मासिक पाळी सुरु असताना तिला विविस्त्र केले. त्यानंतर तिचे रक्त कापसाच्या बोळ्याने एकत्रित करुन बाटलीत जमा केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडीतील धानोरीसह बीडमधील सौदानामध्ये घडली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावसदीर, भाच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिअधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जून २०१९ ते मार्च २०२३ कालावधीत घडली.

फिर्यादी महिला आणि आरोपीचे जून २०१९ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पतीसह सासू, सासरा आणि इतर नातेवाईकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. तर सासर्‍याने फिर्यादी अंघोळ करीत असताना स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडा ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर २०२२ मध्ये गणपती उत्सवात आरोपींनी अघोरी विद्या करण्यासाठी संगनमताने फिर्यादी महिलेचे हातपाय पकडून तिला विवस्त्र केले. त्यावेळस महिलेला मासिक पाळी सुरू होती. अघोरी विद्यासाठी  दीरासह मावसदीराने कापूस घेउन महिलेच्या मासिक पाळीचे रक्त बाटलीत एकत्रित केले. अशाप्रकारे घृणास्पद प्रकार केल्यानंतर महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली.