अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे डहाणूकर काॅलनी पोलीस चौकीत नियुक्तीस आहे. घराच्या मालकी हक्कावरुन एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला नव्हता. मात्र, शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला मोबाइलवर संदेश पाठवून पोलीस चौकीत बोलावून घेतले. आरोपीला अटक करण्याची भीती घालून शिंदे यांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले.
या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने शिंदे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यााचे आदेश देण्यात आले. पोलीस दलाची प्रतिमा शिंदे यांनी मलीन केल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा