पुणे, दि. ११/०५/२०२४: शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे १२ मे रोजी सकाळी ८ वाजता विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर येथे, आंबेगांव विधानसभा मतदारसंघात शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खुर्द येथे, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल, तिन्हेवाडी, राजगुरुनगर, भोसरी विधानसभा मतदारसंघात घरकुल इडब्ल्युएस टाऊनहॉल, चिखली, हडपसर विधानसभा मतदारसंघात साधना शैक्षणिक संकुल, माळवाडी हडपसर येथून साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी दिली आहे.
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार