पुणे, २९/०३/२०२३: संरक्षण मंत्रालयाच्या विभागात कुक (स्वयंपाकी)होण्यासाठी एकाने डमीला परिक्षेस बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांनाही विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
दिपु कुमार (23, रा. बिहार) आणि शैलेंद्र सिंग (24, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबात राहुल महेंद्रसिंह राठी (42, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्रीफ बॉर्डर रोड ऑरगनायझेशन काम करते. या विभागाद्वारे सिमावर्ती भागामध्ये रस्ते बांधणीचे काम चालते. या विभागात नोकरीसाठी स्वयंपाकीच्या (कुकच्या) जागा निघल्या होत्या. त्यासाठी 28 मार्च रोजी धानोरी येथील भैरवनगर येथे या विभागाच्या परिक्षा होणार होत्या. या परिक्षेसाठी शैलैंद्र सिंग या उत्तरप्रदेशच्या परिक्षार्थीने अर्ज दाखल केला होता. परंतु, दिप कुमार याच्याबरोबर परिक्षेपूर्वी झालेल्या ओळखूतून सिंग याने त्याला परिक्षेस डमी बसण्यासाठी गळ घातली. त्यातून दिप कुमार देखील तयार झाला. या दरम्यान हॉल तिकीट घेऊन परिक्षेस बसलेल्या दिपकुमार विषयी परिवेक्षकांना संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दिप कुमार गडबडला. त्यानंतर त्याच्याकडे आणखी विचारणा केल्यानंतर त्याने आपण डमी बसले असल्याचे व मुळ परिक्षार्थी बाहेर थांबल्याचे सांगितले. याबाबत संबंधी विभागाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर