पुणे, ३१/०७/२०२३: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे पत्रकार संघास भेट देऊन, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी सर्व पत्रकार मित्रांशी अनौपचारिक संवाद साधला.
पुणे पत्रकार संघाची रविवारी निवडणूक संपन्न झाली. पत्रकार पांडुरंग सांडभोर यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी उमेश शेळके स्वप्नील शिंदे, सरचिटणीस सुकृत मोकाशी, चिटणीस प्रज्ञा केळकर-सिंग, पूनम काटे, खजिनदार पदी अंजली खमितकर यांची निवड झाली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्ष दुधे, वरद पाठक, विक्रांत बेंगळे, शहाजी जाधव, श्रद्धा सिदीड, विनय पुराणिक, गणेश राख, संभाजी सोनकांबळे, शंकर कवडे, भाग्यश्री जाधव यांची निवड झाली.
या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी