October 14, 2024

पुणे: वारजे माळवाडीत शस्त्रधारी चोरट्याची दादागिरी, दाम्पत्याला अडवून दुचाकीची केली तोडफोड

पुणे, दि. २६/०३/२०२३:  पत्नी मुलांसह दुचाकीवर घरी निघालेल्या तरुणाचा पाठलाग करीत शस्त्रधारी चोरट्यांनी अडवून पैशांची मागणी केली. तरुणाने पैसे न दिल्यामुळे चोरट्यांनी  दुचाकीची तोडफोड केल्याची घटना २४ मार्चला वारजे माळवाडीत घडली आहे. याप्रकरणी दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुराग हिवाळे (वय २६, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग हे २४ मार्चला दुचाकीवरुन पत्नी मुलासह घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या  दोघा चोरट्यांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. चोरट्यांना पैसे न मिळाल्यामळे त्यांनी अनुरागच्या दुचाकीवर कोयत्याने मारुन तोडफोड केली आहे. त्यामुळे हिवाळे कुटूंबियामध्ये भीतीचे वातावरण असून वारजे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.