पुणे, 26 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ व पीवायसी ब या संघांनी अनुक्रमे टेनिसनट्स व एफसी गन्स अँड रोझेस या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत इलाईट डिव्हिजनमध्ये उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पीवायसी अ संघाने टेनिसनट्स संघाचा 24-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 110 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या राजेश कासट व जयंत कढे या जोडीने टेनिसनट्सच्या श्रीशहा भट व अमित किंडो यांचा 6-3 असा तर 100 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या हिमांशू गोसावी व केदार शहा यांनी सुनील लुल्ला व जितेंद्र जोशी यांचा 6-0 असा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर 90 अधिक गटात पीवायसीच्या अनुप मिंडाने ऋतू कुलकर्णीच्या साथीत टेनिसनट्सच्या संदीप बेलुडी व आलोक नायर यांचा 6-1 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या लढतीत खुल्या गटात पीवायसीच्या अभिषेक ताम्हाणे व केतन धुमाळ यांनी रवी कोठारी व जॉय बॅनर्जी या जोडीचा 6-2 असा सहज पराभव करून विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात प्रशांत गोसावी, राधिका मांडके, योगेश पंतसचिव, अनिरुद्ध साठे, अमोघ बेहेरे, रोहित शिंदे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ब संघाने एफसी गन्स अँड रोझेस संघाचा 22-17 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: इलाईट डीव्हिजन:
पीवायसी अ वि.वि.टेनिसनट्स 24-06(110 अधिक गट: राजेश कासट/जयंत कढे वि.वि.श्रीशहा भट/अमित किंडो 6-3; 100 अधिक गट: हिमांशू गोसावी/केदार शहा वि.वि.सुनील लुल्ला/जितेंद्र जोशी 6-0; 90 अधिक गट: अनुप मिंडा/ ऋतू कुलकर्णी वि.वि.संदीप बेलुडी/आलोक नायर 6-1; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.रवी कोठारी/जॉय बॅनर्जी 6-2);
पीवायसी ब वि.वि.एफसी गन्स अँड रोझेस 22-17(110 अधिक गट: प्रशांत गोसावी/राधिका मांडके वि.वि.संजय रासकर/पुष्कर पेशवा 6-2; 100 अधिक गट: परज नाटेकर/अमित नाटेकर पराभुत वि.शैलेश पटवर्धन/पंकज यादव 4-6; 90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अनिरुद्ध साठे वि.वि.देशपांडे/धनंजय कवडे 6-4; खुला गट: अमोघ बेहेरे/रोहित शिंदे वि.वि.संग्राम चाफेकर/वैभव अवघडे 6-5).
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन