July 22, 2024

पुणे: दहशत माजविणाऱ्या सराइतवर एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई

पुणे, दि. १३/०४/२०२३: शहरातील चतुःशृंगी  हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीएडीए नुसार केलेली ही नववी कारवाई आहे.

रणजीत रघुनाथ रामगुडे वय-२० रा. सुतार वाडी असे स्थानबद्ध केलेल्या सराइताचे नाव आहे.

सराईत रणजित याने साथीदारांसह चतुःशृंगी व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारदार हत्यारे सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत,वाहनांची तोडफोड,दंगा,बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ०५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

याप्रकरणी प्राप्त प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन सराईत रणजित याच्याविरुद्ध एमपीएडीएनुसार स्थानबद्ध तेची कारवाई करण्यात आली त्याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षा करीता स्थानबध्दतचे आदेश पारीत केले आहेत. सराईताला स्थानबध्द करण्यासाठी पोलीस निरीक्षक.बालाजी पांढरे , पोलीस निरीक्षक,  अंकुश चिंतामण  व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी कामगिरी पार पाडली.