May 19, 2024

पुणे: आंबेगाव खुर्दमधील सराईत कांबळे टोळीविरुद्ध मोक्का, पोलीस आयुक्तांकडून ३४ टोळ्यांविरुद्ध मोक्का

पुणे, दि. ९/०७/२०२३: भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत आदित्य कांबळे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीने आंबेगाव खुर्दमध्ये लुटमार केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्कानुसार केलेली ही ३४ वी कारवाई आहे.

आदित्य / सोन्या खंडू कांबळे (वय २० रा हनुमाननगर आंबेगाव खुर्द) सोहेल मोदीन आसंगी उर्फ लादेन (वय २२ रा. भोलेवस्ती, इंद्रायणीनगर ) अमोल तानाजी ढावरे / डावरे (वय १९ रा- विश्व हाईट जवळ मोडक वस्ती जांभुळवाडी कात्रज) अजय विजय पांचाळ (वय २१ रा. नवीन वसाहत, कात्रज) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

आदित्य /सोन्या याने देशी दारुच्या दुकानामध्ये मॅनेजरला शिवीगाळ करीत मी आताच जेलमधुन सुटुन आलो आहे. मला हप्ता चालु कर असे बोलुन शिवीगाळ केली. हप्ता चालु न केल्यास सोडणार नाही असे म्हणुन आरडा ओरड केली. काउंटरमध्ये असलेले १० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन दुकानाच्या दिशेने दगड फेकुन दहशत केली होती. टोळीने दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, दंगा,बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करणे, जनमानसात दहशत पसरविणे गंभिर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केले आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अपर आयुक्त प्रवीण पाटील यांच्यावतीने उपायुक्त स्मार्तना पाटील यांना पाठविला.

कांबळे टोळीने संघटितपणे दहशतीच्या मार्गाने अनेक गुन्हे केल्याचे दिसुन आले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. आतापर्यंत शहरातील ३४ सराईत टोळ्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यामध्ये दहशत बसण्यास मदत झाली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नारायण शिरगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सचिन धामणे, सहायक फौजदार चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे यांनी केली .