May 2, 2024

पुणे: पर्वतीतील सराईत मापारी टोळीविरुद्ध मोक्का

पुणे, दि.११/०८/२०२३: शहरातील पर्वती परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत बिपीन मापारीसह टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही ४५वी कारवाई आहे. त्यामुळे विविध भागातील सराईत गुंडांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बिपीन मिलिंद मापारी, वय २४ ( टोळी प्रमुख) त्रषिकेश ऊर्फ भावडया बबन धिवार (वय २१) , निरज सुनिल खंडागळे (वय २०) विशाल ऊर्फ दौलत पिराजी आगम ( वय ३४ सर्व रा. दत्तवाडी ) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी बिपीन मिलिंद मापारी ( टोळी प्रमुख ) याच्याविरुध्द ७ गुन्हे आणि ऋषिकेश धिवार याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी बेकायदेशीर मार्गाने हिंसाचाराचा वापर करून नागरिकांना धमकाविले. जुलुम जबरदस्ती करून लुटमार केली. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील १० वर्षात टोळीने खूनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे असे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पर्वतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मापारी टोळीविरुद्ध कारवाई केली. गुन्ह्याचा तपास एसीपी अप्पासाहेब शेवाळे करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उप निरीक्षक जगदाळे, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे यांनी केली.

टोळीने तरूणावर केला होता वार
फिर्यादा मित्रासोबत फोनवर बोलत असताना आरोपी ऋषि उर्फ भावडया, बिपिन, दौलतने त्याला हटकले. स्वप्निल उर्फ बाबा जगताप याच्याकडे रागाने का बघत असतो, तो आमचा मित्र आहे, तुला खुप माज आला आहे का असे म्हणुन तरूणावर हत्याराने करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ४५ टोळ्यांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे .