May 15, 2024

पुणे: पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी अशी आहे पार्किंगची व्यवस्था

पुणे, २९ एप्रिल २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता.२९) पुण्यामध्ये वानवडी येथे रेस कोर्स येथील मैदानावर जंगी सभा होणार असून यासाठी दोन लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज भाजपतर्फे वर्तविण्यात आला आहे. पण नरेंद्र मोदी सभेसाठी येत असताना पार्किंगची व्यवस्था कशी आहे याचे भान असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे पोलिसांतर्फे करण्यात आलेली पार्किंगची व्यवस्था कशी आहे हे थोडक्यात जाणून घ्या.

सभेच्या ठिकाणी दुपारी अडीच वाजल्यापासून नागरिक करण्यास सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष सभा ही साडेसहाच्या सुमारास सुरू होणार आहे यामुळे पुणे शहरासह बारामती, शिरूर आणि मावळ या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतील. त्यांची जगण्या येण्याची व्यवस्था करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गाड्या पार्किंग क्षेत्रात उभे असणार आहेत पण हे पार्किंग कसे असणार याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अशी आहे पार्किंग व्यवस्था
इम्प्रेस गार्डन पार्किंग : या ठिकाणी सभेसाठी येणारे व्हीआपी, पत्रकार यांची वाहने पार्क होतील.
रक्षक – अरुण हेगडे 9091174141
भाजपा – किरण कांबळे 9622686320

विद्याभवन महाविद्यालय : फातीमानगर चौक, बारामती, हडपसर, शिरुर कडुन येणारे नागरीक दुचाकी व चारचाकी वाहने ही भैरोबानाला वायजक्शन येथुन यु टर्न करुन चारचाकी वाहने ही विद्याभवन महाविद्यालय येथे पार्क करतील. मोठ्या बसेस ही सरळ पुढे काळुबाई चौकातुन डाव्या साईडला वळन रामटेकडी इंडस्ट्रीयल एरीया मध्ये पार्क करतील.

रक्षक – मोहन माळी 9921724141
भाजपा – कुलदिप साळवेकर 8087960678

कॅम्प एज्युकेशन सोसायटी : मम्मादेवी चौक या ठिकाणी स्वारगेट सातारा सांगली कात्रज कडुन याणारी वाहने ही मम्मादेवी चौकातुन उजव्या साईडला वळुन घेवुन सदर ग्राऊंड मध्ये पार्क होतील. मम्मादेवी चौक ते वानवही
बाजार वाय जंक्शन या दरम्यान रस्त्याच्या डाव्या साईडला पार्क होतील.

रक्षक – महेंद्र 9011474141
भाजपा – संदिप शेडगे 9309114699

आर्मी पब्लिक स्कुल घोरपडी बाजार : या ठिकाणी खेड, येरवडा, आळंदी, पिंपरी चिंचवड साईडने येणारी वाहने ही घोरपडी जंक्शन येथुन डावीकडे वळुन चारचाकी वाहने पार्क होतील.
रक्षक – अर्जुन पायगुडे 9604930060

बस पार्किंग : बारामतीहून येणाऱ्या सर्व मोठ्या बसेस ह्या नागरिकांना भैरोबानाला वाय जक्शन येथे नागरिकांना उतरवुन तसेच नगर भागतुन येणाऱ्या बसेस ह्या नागरिकांना वॉर मेमोरीवल येथे उतरवुन सरळ पुढे काळुबाई
चौकातुन डाव्या साईडला वळुन हडपसर इंडस्ट्रीयल एरीया वानवडी पोलीस स्टेशनच्या आवारात मध्ये पार्किंग करतील.
रक्षक – गणेश देवकर 9011734141
भाजपा – शहाजी कोकाटे 7744880294

https://www.punekarnews.in/pune-know-parking-arrangements-for-todays-election-rally-by-prime-minister-narendra-modi/

कोंढव्याकडुन येणारी वाहने : भैरोबानाला चौक ते वानवडी बाजार वाय जंक्शन दरम्यान रसत्याचे कडेने एक साईडने पार्क होतील.

टर्फ क्लब समोरील पाकींग : सर्व बंदोबस्तासाठी येणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वाहने ही टर्फ क्लब समोरील फुटबॉल ग्राऊंड व टर्फ क्लब समोरील पाकींग करतील.
रक्षक – विशाल 9665040984

अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क
ए.सी.पी. देशपांडे 9923188400
ए.सी.पी. सातव 9923107610
पि.आय.पंदरकर 9823233302
पि.आय.कोळी 9359117793
रक्षक एजन्सी नितीन देशमुख – 7097251717