पुणे, ०३/०३/२०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल
करण्यात येतो.
दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम
रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजी मान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/- दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी