October 3, 2024

पुणे: प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास

पुणे, ०३/०३/२०२३: जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९ रोजी मा. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस
मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.