पुणे, ०२/०४/२०२३: फुटबाॅल सामन्या दरम्यान नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर खेळाडू मध्ये जोरदार मारामारीचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्या प्रकरणी १३ जणांच्या विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
यासंदर्भात अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांच्यासह १३ जणांच्या विरुद्ध मारामारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वीरेंद्र महेंद्र परदेशी (वय -२२, रा. सहकारनगर,पुणे) याने डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यातील उपांत्यफेरी सुरु होती. त्यावेळी खेळताना चेंडूच्या ताब्यावरुन वाद झाला. त्यानंतर वीरेंद्र परदेशी याच्या संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी गटातील खेकडूकडून शिवीगाळ करण्यात आली.
प्रतिस्पर्धी संघातील ११ खेळाडू तसेच अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे परदेशी याने दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एस कांबळे पुढील तपास करत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.