पुणे, १२/०४/२०२३: स्वस्त धान्य दुकानदारांकडून तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेऊन नंतर तो तांदूळ केडगाव येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना खडक पोलिसांनी छापा टाकून टेम्पो पकडून तिघांना बेड्या ठोकल्या. संशयीत आरोपींना धान्य विक्री करणारे स्वस्त धान्य विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
जावेद लालु शेख (35), अब्बास अब्दुल सरकावस (34) आणि इम्रान अब्दुल शेख (30, तिघेही रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी खडक पोलिसांना अवैधरित्या स्वस्त धान्य दुकानदारांडून काळ्या बाजार भावाने तांदळू खरेदी करून तांदळ्याच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो केडगाव येथे विक्रीसाठी निघालेला असताना खडक पोलिसांनी काशेवाडी येथील राजीव गांधी सोसायटी येथे टॅम्पो पकडला. यावेळी त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह 54 तांदळाच्या 15 किलोच्या पिशव्या असा तब्बल 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त करण्यात आला. यावेळी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता हा धान्यसाठा त्यांच्याकडून विक्रीसाठी नेत असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकणात तिघांना आत अटक करण्यात आली आहे.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
गरिब नागरिकांच्या वाट्याचे धान्याची काळ्या बाजाराने स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी करून त्याची चढ्या किंमतीला हा तांदूळ विक्रीसाठी चालविल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. त्यांना हे धान्य रेशनिंग दुकानदारांनी कसे विकत दिले. ते दुकानदार कोण आहेत, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून हा काळा बाजार केव्हा पासून सुरू होता याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. नारिकांच्या तोंडचा घास पळविणार्यांचे मोठे रॅकेट असण्याची देखील शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन