April 27, 2024

पुणे: नशा करण्यासाठी मोबाइलची चोरी करणारा अटकेत; ३२ मोबाइल, दुचाकी जप्त, युनीट एकची कामगिरी

पुणे, दि. ११/०९/२०२३: नशा भागविण्यासाठी पहाटेच्या वेळी नागरिकांचे मोबाईल हिसकाविणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ७० हजारांचे तब्बल ३२ मोबाईल आणि १ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. रैय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख, (वय २० रा. निहाल हाईटस, फ्लॅट नं. ३०३, मिठानगर, कोंढवा खुर्द )असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सोमवार पेठे परिसरात चोरट्याने उघडया दरवाज्याचे वाटे घरात शिरून चार मोबाइल आणि रोकड चोरून नेली होती. गुन्ह्यातील आरोपी भवानी पेठेत येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रैय्यान ऊर्फ फईमला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे ३२ मोबाईल जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, दत्ता सोनावणे, आण्णा माने, अभिनव लडकत, शुभम देसाई, अजय थोरात, अमोल पवार, शशीकांत दरेकर यांनी केली.

अशी करीत होता मोबाइलची चोरी
सराईत आरोपी रैय्यान उघडया दरवाज्यावाटे घरात प्रवेश करीत होता. त्याशिवाय पायी जाणारे लोकांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. रैय्यान हा कोंढवा पोलीस ठाणेकडील सराईत गुन्हेगार असुन, तो दुचाकीवरुन परिसरात टेहाळणी करुन, मोबाईल चोरीचे प्लॅनिग करीत होता. त्याला नशा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने मोबाइलची चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.