पुणे, दि. २१/०६/२०२३- चोरट्यांना काय चोरण्याची आवड निर्माण होईल, याचा काही नेम नाही. फक्त मोठा आवाज करणार्या यामाहा आरएक्स दुचाकींची चोरी करण्यासाठी शहरभरात रेकी करुन चोरी करणार्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
नागेश रमेश बेडजंगम (वय २० रा. रायवाडी, लोणी काळभोर, मुळ – आपसिंग सोलापुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मगरपट्टा हडपसर परिसरात दोघेजण विनाक्रमांक दुचाकीवरुन फिरत असल्याची माहिती पोलीस अमलदार सुमीत ताकपेरे आणि महेश पाटील यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नागेश बेडजंगम आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दुचाकीची कागदपत्रे नसल्याचे सांगड उडवाडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीदरम्यान नागेशने मांजरी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी हडपसर, विमाननगर, येरवडा, आळंदी परिसरातून यामाही दुचाकींची रेकी करुन चोरी केल्याची कबुली दिली. मौजमजा करण्यासाठी आणि यामाहा आरएक्सची आवड असल्यामुळे फक्त त्याच दुचाकी चोरत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, राठोड, सुमित ताकपेरे, दगडे, महेश पाटील, लोखंडे, येडे यांनी केली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.