पुणे, दि. १३/०६/२०२३: मोटारीच्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी १३ हजारांची लाच घेताना येरवडा पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी तिघा कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित यांना अटक केली आहे. पोलिस हवालदार जयराम सावलकर, पोलिस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून ते मोटारीच्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस हवालदार जयराम सावळकर, पोलीस हवालदार विनायक मुधोळकर,पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित यानी तक्रारदारांकडे २० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १३ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित यांना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे ,पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, मुकुंद आयाचीत, भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी केली.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान