December 14, 2024

पुणे: उरळी कांचनमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे, दि. १३/०६/२०२३: भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात १२ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास उरळी कांचन परिसरात घडला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश गजेंद्र काजळे (वय १८, रा. बालेवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बबलू मोरे (वय २२, रा. चिखली, हवेली) याने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा १२ जूनला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दुचाकीवरुन उरळी कांचन परिसरातून जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनचालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.