पुणे, दि. २१/०४/२०२३: आयपीएल सामन्यावर सट्ट लावणार्या मुंबईतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. लोणावळा परीसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या बंगल्यामध्ये सट्टा डाव उधळून लावण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजवीनसिंग मनजितसिंग बांगा (वय २८) आणि मस्कीनसिंग रजेंद्रसिंग अरोरा (वय ३० दोघेही रा. अॅन्टॉप हिल मुंबई ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट संघादरम्यान खेळावर सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. मुंबईतील दोन सट्टेबाजांनी तुंगार्ली गावचे हद्दीत भाडेतत्वावर बंगला घेतल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने निसर्ग बंगलो सोसायटीतील बंगला क्रमांक तीनवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाईल, लॅपटॉप साहित्यासह एकूण दिड लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (भापोसे) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय महादेव शेलार, प्रदीप चौधरी, प्रकाश वाघमारे, महेश बनकर, रामदास बाबर, रिया राणे, अक्षय सुपे यांनी केली .
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन