July 25, 2024

पुणे: नोकरीच्या आमिषाने महिलेची 38 लाखांची फसवणूक

 पुणे, २०/०४/२०२३: मुंबईतील बेलापूर येथील रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 38 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी, चंदनगर पोलिसांनी सदानंद बाळकृष्ण भोसले (वय- 61 ,रा. नवी मुंबई) आणि संभाजी विजय पाटील( वय- 41 ,रा.नाशिक ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडगावशेरी येथील 52 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 पासून ऑगस्ट 2022 यादरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सदानंद भोसले आणि संभाजी पाटील यांनी आपापसात संगणमत करून फिर्यादींच्या  मुलास व मुलीस आरबीआय बँक, बेलापूर याठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत, त्यांनी वेळोवेळी एकूण 38 लाख 50 हजार रुपये घेऊन,  दोघांना नोकरीस न लावता तसेच पैशाची मागणी केली असता, त्यांना पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक( गुन्हे) जगन्नाथ जानकर पुढील तपास करत आहे.