February 28, 2024

पुणे: वडगाव बुदू्रकमध्ये दोन फ्लॅट फोडले, २ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास

पुणे, दि. १३/०६/२०२३: बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १० ते ११ जूनला वडगाव बुद्रूकमधील सुंदर गार्डन सोसायटी आणि अमल अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आई वडगाव बुद्रूकमधील सुंदर गार्डन सोसायटीत राहायला आहे. १० ते ११ जून दरम्यान त्यांची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २ लाख १६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी विजय ढमढेरे यांच्या फ्लॅटमध्ये शिरुन १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादमाने तपास करीत आहेत.