November 11, 2024

पुणे: दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणीचा मोबाइल हिसकाविला, कल्याणीनगरमध्ये घडली घटना

पुणे, दि. २८/०५/२०२३: दुचाकीवर घरी निघालेल्या तिघा तरुणींचा पाठलाग करुन त्यांना अडवून चोरट्यांनी एका तरुणीचा २५ हजारांचा मोबाइल चोरुन नेला. ही घटना २६ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये विमाननगर रस्त्यावर घडली.

याप्रकरणी अंकिता सिंग (वय २१, रा. लोहगाव) हिने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अंकिता आणि तिच्या दोन मैत्रिणी २६ मे रोजी दुचाकीवरुन घरी जात होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये विमाननगर रस्त्यावर दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन अडविले. चोरट्याने अंकिताच्या हातातील २५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. तिघी मैत्रिणींनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करीत आहेत.