पुणे, दि. २८/०५/२०२३: हॉटेलमध्ये एन्ट्र न दिल्यामुळे वेटर हसल्याच्या रागातून टोळक्याने त्याचा पाठलाग करुन धारदार शस्त्राने वार केल्याची घटना २७ मे रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकात घडली.
धीरेंद्र चौहान (वय २७, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धीरेंद्र मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये कामाला असून २७ मे राजी रात्री सव्वा दोन वाजता काम संपवून तो मित्रासोबत पायी रस्त्याने घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघाजणांनी धीरेंद्रला अडवून हॉटेलमध्ये एन्ट्र न दिल्यामुळे तू का हसला, असा जाब विचारला.
टोळक्याने हत्याराने धीरेंद्रच्या हातावर, डोक्यात, पाठीवर वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जोरे तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत; तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पंतप्रधान आवास योजनेसाठी साडे चार हजार अर्ज