पुणे, दि. २/०६/२०२३ – बोअरवेल ट्रकचालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी ठार झाली आहे. हा अपघात १ जूनला दुपारी पावणेएकच्या सुमारास वाघोली-केसनंद रस्त्यावर घडला. याप्रकरणी ट्रकचालकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
गौरवी जाधव (वय १९ रा. वाघोली ) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण चिन्नास्वामी रामलिंगम (वय ३८, रा. कोलवडी ,हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आशिष रामप्रसाद (वय २३, रा. वाघोली ) याने तक्रार दिली आहे.
आशिष आणि त्याची मैत्रिण गौरवी १ जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघोली गावच्या हद्दीतून दुचाकीवर प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात बोअरवेल ट्रक चालवून लक्ष्मणने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या गौरवीचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात वाहतूककोंडी झाली होती. याप्रकरणी बोअरवेल ट्रकचालक लक्ष्मणला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करीत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.