पुणे, २४/०५/२०२३: युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही सामाजिक संस्था गेले 2 वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन करते. दोन वर्षा पूर्वी संपूर्ण जग कोव्हिड १९ च्या महामारी पुढे हतबल झाले.प्रत्येक जन कोणत्याना कोणत्या प्रकारे या महामारी मुळे बाधित झाला.नुकसान खूप झाले.काहींचे भरून न येण्या इतके नुकसान झाले आहे.यातच स्वप्नील लोणकर या युवकाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन हि आत्महत्या केली.
याच काळात शाळा कॉलेज क्लासेस बंद झाली.यामुळे ग्रामीण भागातील गरीब मध्यमवर्गीय मुले शिक्षणापासून वंचित राहिली.हजारो रुपयांची फी ते भरू शकत नाहित.खरे ˈटॅलन्ट् तर ग्रामीण भागात आहे.फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची दिशा देण्याची.खर तर १२ वी नंतर यांनी आपली दिशा ठरवली पाहिजे. त्या दिशेने प्रयत्नशील असले पाहिजे.याचा विचार करून डॉ विक्रम गायकवाड यांनी त्यांच्या सहकारी युवकांशी मिळून युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही संस्था स्थापन करून लॉकडाऊन काळात या तरुणांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन शिक्षण देण्याचा मानस केला त्यांनी त्यांचे कॉलेजचे मित्र वा सदया प्रशाकीय सेवेत असणारे IPS अधिकारी डॉ केतन पाटील यांच्याशी चर्चा केली ते लगेच तयार झाले व महाराष्ट्रातील युवक घडविण्याचा UPSC मध्ये मराठी टक्का वाढविण्याचा प्रयत्न करण्यासाठी IAS ,IPS , IRS आदि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सत्र ऑनलाईन पद्धतीने आयोजीत केले.यामध्ये या मार्गदर्शनासाठी सिंहाचा वाटा उचलणारे डॉ केतन पाटील साहेब तसेच प्रशासानात असणारे गुणवंत अधिकारी श्री प्रबोधकुमार सर,कल्याणी मालपुरे,देवयानी यादव मॅडम , डॉ हरजिनदरसिंग , डॉ जितेंद्र गुप्ता यांनी मॉक घेण्यासाठी मार्गदर्शनासाठी मदत केली.
हे करत असताना ही लक्षात आले की या विद्यार्थी वर्गास आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते हे ओळखून आर्थिक मदत विद्यार्थी वर्गास देण्यास सुरू केले. १० विद्यार्थ्यांना महिन्याला त्यांचा राहण्याचा व जेवणाचा खर्च पूर्ण होईल एवढे पैसे युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम मार्फत दिले जातात.पहिल्या बॅचमध्ये पाच विदयार्थी मुलाखती पर्यंत गेले व त्यातील दोन विदयार्थी अंतिम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मध्ये यशस्वी झाले उत्तीर्ण झाले.
युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम या वर्षी UPSC२०२२ च्या मुख्य परीक्षेत चार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
१) श्री सोहम सुनील मांढरे (२१७)
२)श्री सागर खराडे (४४५)
३) श्री प्रशांत डगळे (५३५)
४) श्री दिपक कटवा (७१७)
युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम द्वारे UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन कार्यक्रम राबविला जातो.या वर्षासाठी विद्यार्थ्यांनी डॉ विक्रम 8999322855यांना संपर्क करावा असे आव्हान युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम मार्फत करण्यात आले
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन