पुणे, 25 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गटसाखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी ब संघाने पीसीएलटीए संघाचा 24-16 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत इलाईट डिव्हिजनमध्ये ब गटात प्रशांत गोसावी, राधिका मांडरे, परज नाटेकर, अमित नाटेकर, योगेश पंतसचिव, अनिरुद्ध साठे, अमोघ बेहेरे, रोहित शिंदे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ब संघाने पीसीएलटीए संघाचा 24-16 असा पराभव करून आगेकूच केली.
ड गटात एमडब्लूटीए 1 संघाने सोलारिस ईगल्स संघाचा 22-14 असा पराभव करून पहिला विजय नोंदवला. विजयी संघाकडून गजानन कुलकर्णी, राजेश मंकणी, सुमंत पॉल, जयदीप वाकणकर, पार्थ मोहपात्रा, विवेक खडगे यांनी अफलातून कामगिरी केली. अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत क गटात एफसी गन्स अँड रोझेस संघाने पीवायसी क संघाचा 20-15 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
उपांत्य फेरीत पीवायसी अ विरुद्ध टेनिसनट्स यांच्यात पहिला सामना, तर पीवायसी ब विरुद्ध एफसी गन्स अँड रोझेस यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी: इलाईट डीव्हिजन:
गट ब: पीवायसी ब वि.वि.पीसीएलटीए 24-16(110 अधिक गट: प्रशांत गोसावी/राधिका मांडरे वि.वि.सुधाकर/गिरीश कुकरेजा 6-4; 100 अधिक गट: परज नाटेकर/अमित नाटेकर वि.वि.राजेश मित्तल/रवी जौकानी 6-5; 90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अनिरुद्ध साठे वि.वि.सचिन भास्करन/कुरियन टी. 6-2; खुला गट: अमोघ बेहेरे/रोहित शिंदे वि.वि.शिलादित्य बी./कल्पेश मंकणी 6-5);
गट ड: एमडब्लूटीए 1 वि.वि.सोलारिस ईगल्स 22-14(110 अधिक गट: गजानन कुलकर्णी/राजेश मंकणी वि.वि.सुनील परहाड/सिद्धू जोशी 6-4; 100 अधिक गट: सुमंत पॉल/जयदीप वाकणकर वि.वि.संजीव घोलप/गिरीश साने 6-0; 90अधिक गट: आशिष मणियार/प्रफुल नागवानी पराभुत वि.सुबोध पेठे/अन्वित पाठक 4-6, खुला गट: पार्थ मोहपात्रा/विवेक खडगे वि.वि.रवींद्र पांडे/निनाद वाहीकर 6-4);
गट क: एफसी गन्स अँड रोझेस वि.वि.पीवायसी क 20-15(110 अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा पराभुत वि.अभय जमेनिस/सारंग देवी 4-6; 100 अधिक गट: मिलिंद तलाठी/संग्राम चाफेकर वि.वि.राजू कांगो/श्रवण हर्डीकर 6-1;90 अधिक गट: धनंजय कवडे/पंकज यादव पराभुत वि.अमित लाटे/मिहिर दिवेकर 4-6; खुला गट: सचिन साळुंखे/वैभव अवघडे वि.वि.तन्मय चोभे/ध्रुव मेड 6-2).
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी