December 13, 2024

सह्याद्रि हॉस्पिटल्स ३ ते ४ वर्षांत आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधा दुप्पट करण्यासाठी करणार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक

पुणे, ०६ जून २०२३: पश्चिम भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटल साखळी असलेले सह्याद्रि हॉस्पिटल्स लक्षणीय वाढ आणि विस्तारासाठी सज्ज असून आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधांमध्ये ७५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत पुढील ३ ते ४ वर्षांमध्ये क्षमता दुप्पट करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

या साखळीतील ९ व्या हॉस्पिटलची सुरूवात सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या आक्रमक विस्तार योजनांचा एक भाग आहे कारण पुणे आणि नाशिक मधील स्थान आणखी मजबूत करताना आरोग्यसेवा नेटवर्क नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि या भागातील इतर शहरांमध्ये विस्तारण्याची त्यांची योजना आहे.

विस्तार योजनेत ब्राउनफील्ड तसेच ग्रीनफिल्ड प्रकल्प दोन्ही समाविष्ट आहेत. शिवाय, सह्याद्रि हॉस्पिटल्सचा यशस्वी विलीनीकरण आणि अधिग्रहणांचा एक मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. देशाच्या पश्चिम भागात विस्तारासाठी सध्या काही करारांवर काम सुरू आहे.

विस्तार योजनांचा एक भाग म्हणून, सह्याद्रि हॉस्पिटल्सने हडपसर परिसरात सह्याद्रि हॉस्पिटल हडपसर अॅनेक्ससह आपली क्षमता दुप्पट केली आहे. सह्याद्रिकडे माता आणि बाल संगोपनासाठी समर्पित असे २० हून अधिक उच्च कुशल चिकित्सक आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रा मधील १००  हून अधिक समर्पित चिकित्सकांची टीम कार्यरत आहे.

विस्ताराविषयी बोलताना, सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री. अबरारली दलाल म्हणाले, “महाराष्ट्रातील दर्जेदार आरोग्य सेवेची वाढती मागणी आम्ही पूर्ण करत असताना सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांची घोषणा करताना मला आनंद होत आहे. बेडची क्षमता वाढवणे आणि वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यावर असलेले आमचे धोरणात्मक लक्ष यामुळे आम्हांला आरोग्य सेवेमधील अंतर भरून काढण्यात आणि समाजाच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. धोरणात्मक विलीनीकरण आणि अधिग्रहणांसह आमच्या ब्राउनफील्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे अधिकाधिक रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा-सुविधा मिळण्याची खातरजमा  सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या हडपसर केंद्राचा विस्तार हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि स्थानिक नागरिकांच्या विशिष्ट आरोग्य सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

खाटांची क्षमता वाढवण्यावर आणि विशेष वैद्यकीय सेवेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून, सह्याद्रि हॉस्पिटल्स समाजाला सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वचनबद्ध आहे.