पुणे, 6 जून 2023- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित ग्रॅविटस फाउंडेशन प्रायोजित व कॉनव्हेक्स सहप्रायोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत पँथर्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पँथर्स संघाने लायन्स संघाचा 263-184 असा पराभव करून दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये पँथर्स संघाला लायन्सकडून 49-60 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, स्क्वॅशमध्ये समीर सालियन, प्रतिश थडानी, किरण भंडारी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पँथर्स संघाने लायन्स संघाचा 72-35 असा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये अरण थवानी/रक्षय ठक्कर, तितिक्षा पवार/आदित्य थोरात यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर पँथर्स संघाने लायन्स संघाचा 70-53 असा, तर टेनिसमध्ये पँथर्स संघाने लायन्स संघाचा 72-36 असा पराभव करून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात किंग्स संघाने वेकफिल्ड संघाचा 273-213 असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पँथर्स वि.वि लायन्स 263-184
बॅडमिंटन: पँथर्स पराभूत वि लायन्स 49-60 (किरण भंडारी/गौरव हिंगोराणी पराभूत वि कुणाल संघवी/अमान खन्यारी 08-11, रक्ष ठक्कर/पृथ्वी शहा पराभूत वि पंकज शाह/अर्णव साठे 08-15; प्रतिश थडानी/अभिजीत शाह वि.वि योगेश ठुबे /अवराज सिंग छाब्रा; आदित्य थोरात/समीर सालियन पराभूत वि मोक्षित पोरवाल/अमरजीत छाब्रा 18-31;
स्क्वॅश: पँथर्स वि.वि लायन्स 72-35 (समीर सालियन वि.वि कियारा गाडा 11-01; प्रतिश थडानी वि.वि अमन खन्यारी 15-14; किरण भंडारी वि.वि कुणाल संघवी 15-08; अरण थवानी वि.वि योगेश ठुबे 31-11);
टेबल टेनिस: पँथर्स वि.वि लायन्स 70-53 (समीर सालियान/नितीश टंडन पराभूत वि योगेश ठुबे/ऋषिकेश अधिकारी 10-11; अरण थवानी/रक्षय ठक्कर वि.वि मोक्षित पोरवाल/पंकज शहा 15-11; प्रतिश अरथी/देवर्या राठी पराभूत वि अर्णव साठे/अजय जाधव 14-15; तितिक्षा पवार/आदित्य थोरात वि.वि अनिल हिंगोरानी/त्रिलोक थडानी 31-16)
टेनिस: पँथर्स वि.वि लायन्स 72-36(पृथ्वी शाह/समीर सालियन वि.वि पंकज शाह/झील शाह 11-06; प्रतिश थडानी/गौरव हिंगोरानी वि.वि चिराग साबुनानी/अनिल हिंगोरानी 15-06;अरन थवानी/आदित्य थोरात वि.वि मोक्षित पोरवाल/अवराज सिंग छाब्रा 15-06; रक्षय ठक्कर/देवर्या राठी वि.वि अजय जाधव/ ऋषिकेश ऋषिकेश अधिकारी 31-18);
किंग्स वि.वि.वेकफिल्ड 273-213
बॅडमिंटन: किंग्स वि.वि.वेकफिल्ड 72-59(अजय शर्मा/कुमार पोरवाल वि.वि.आर्यन शर्मा/नीलेश खंडेलवाल 11-05; प्रांजली नाडगोंडे/राजेश बनसोडे वि.वि.जयदीप पटवर्धन/सोनाली शिंदे 15-13; नित्या शहा/नील हळबे वि.वि.अद्विका परमार/रिवज्योत सिंग बेदी 15-13; आनंद शहा/सारा नवरे वि.वि. रोनक शाह/सतीश मुंदडा 31-28);
स्क्वॅश:किंग्स वि.वि.वेकफिल्ड 72-40 (आनंद शहा वि.वि.रिवजोत सिंग बेदी 11-06; टोनी शेट्टी वि.वि.इव्हाना गाडा 15-12; नित्या शहा वि.वि.आर्यन शर्मा 15-09; अंगद मारवाह वि.वि.जसप्रीत सिंग 31-13);
टेबल टेनिस: किंग्स वि.वि.वेकफिल्ड 72-55(राजेश बनसोडे/कुमार पोरवाल वि.वि.रिवज्योत सिंग बेदी/आर्यन शर्मा 11-10; आनंद शहा/नित्या शहा वि.वि. रोनक शहा/अनपूर्णा राठी 15-06; भार्गव पाठक/संजय दिडी वि.वि.निलेश खंडेलवाल/सचिन राठी 15-13; अजय शर्मा/सुनील शहा वि.वि.जयदीप पटवर्धन/अनंत सोमाणी 31-26);
टेनिस: किंग्स पराभुत वि.वेकफिल्ड 57-59 (प्रांजली नाडगोंडे/सारा नवरे वि.वि.रिवज्योत सिंग बेदी/अनंत सोमाणी 11-10; नित्या शहा/राजेश बनसोडे वि.वि.आर्यन शर्मा/नीलेश खंडेलवाल 15-03; तुषार आसवानी/टोनी शेट्टी पराभूत वि./रवी पिट्टी 13-15; रियान मुजगुले/होशेदार डेबू पराभुत वि.जयदीप पटवर्धन/सचिन राठी 18-31;
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.