June 24, 2024

स्व. पं श्रीकांत देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ जून रोजी ‘संगीत संध्या’चे आयोजन

पुणे, दि. ७ जून, २०२४ : सवाई गंधर्व यांचे नातू आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य स्वर्गीय पं श्रीकांत देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्व पं श्रीकांत देशपांडे मित्र मंडळाच्या वतीने गुरुवार दि १३ जून रोजी ‘संगीत संध्या’ या अभिजात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे हे १२ वे वर्ष असून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायं ५ वाजता कार्यक्रम संपन्न होईल, अशी माहिती पं श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे यांनी कळविली आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यक्रमाची सुरुवात आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. डॉ राम देशपांडे यांच्या गायनाने होईल तर ज्येष्ठ व दिग्गज गायक पं डॉ अजय पोहनकर यांचे सुश्राव्य गायन उत्तरार्धात रंगेल. दोन्ही कलाकारांना भरत कामत हे तबला तर सुयोग कुंडलकर हे संवादिनीसाथ करतील. आनंद देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.