June 14, 2024

लोणावळा स्टेशन वर ट्रैफिक ब्लाक कामांमुळे काही लोकल गाड्या प्रभावित

पुणे, २७/०६/२०२३: मुंबई विभागातील लोणावळा स्टेशन वर ट्रैफिक ब्लॉक घेऊन विविध टेक्निकल/ तांत्रिक कामे केली जातील या कारणाने मंगळवार दिनांक 27 जून ते गुरुवार दिनांक 29 जून पर्यंत पुण्यावरुन लोणावळा करीता 09.57 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01562, 11.17 वाजता रवाना होणारी लोकल
संख्या 01564 अणि लोणावळा वरून पुण्याकरीता 14.50 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01561 तसेच लोणावळा वरून शिवाजीनगर करीता 15.30 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01563 रद्द राहील.