पुणे, ०७/०१/२०२५: इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा ट्रेंड वाढल्याने मानवी नातेसंबंधांच्या व्याख्याच बदलल्या आहेत. इंटरनेट मुळे नवीन नाती जुळत आहेत तर कधी कधी जुनी नाती तुटत आहेत. ह्या नातेसंबंधावर वर आधारित इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची सुंदर कथा सांगणारे ‘लेट्स मीट’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय मिश्रा यांच्या ‘गुठली लड्डू’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी UV फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘लेट्स मीट’ या चित्रपटात आधुनिक युगातील एक्स्ट्रोवर्ट लड़के आणि इन्ट्रोवर्ट मुलगी यांच्या सोशल मीडियावर फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ह्या व्हर्च्युअल दुनियेत फुलणाऱ्या या नात्याला खऱ्या जगाच्या गुंतागुंतीचा सामना करण्याची हिंमत आहे की नाही? हे नाते व्हर्च्युअल जगात आहे तितकेच खऱ्या जगातही प्रेमळ राहील का? या गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे लेट्स मीट ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अभिनेता निखिल (तनुज विरवानी) आणि रिया हे दोघेही त्यांच्या घराच्या खिडकीत उभे आहेत आणि बाहेरील जग पाहत आहेत. त्यांचे चेहरे दाखवले गेले नाही आहेत. मुलीच्या खोलीचा रंग निळा आणि मुलाच्या खोलीचा रंग गुलाबी आहे. पोस्टरमध्ये मागून नायक-नायिकेचे चित्रण चित्रपटाचे शीर्षक आणि संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे परिभाषित केली आहे. जे लोक त्यांचे चेहरे उघड न करता सोशल मीडियासारख्या आभासी जगात त्यांच्या भावना कशा प्रकारे व्यक्त करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
चित्रपटाचे निर्माते प्रदीप रंगवानी आणि दिग्दर्शक रवींद्र संधू म्हणाले, “इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे कधी न बोलणाऱ्या व्यक्तींना वाचा फुटली आहे. आपले मत विचार मांडताना बाचकणारे लोक बेधडक बोलताना दिसत आहेत. सोशल मीडियाने त्यांना आत्मविश्वास दिला आहे. ‘लेट्स मीट’ हा चित्रपट आजच्या पिढीला दर्शवत आहे. ज्यात ऑनलाइन प्रेमाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडणे ही आजच्या काळातील वास्तविकता आहे आणि हे सत्य आम्ही आमच्या चित्रपटात नाटकीय आणि मनोरंजक शैलीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाचे निर्माते प्रदीप रंगवानी हे आउट ऑफ द बॉक्स चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. प्रदीप रंगवानी यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित ‘गुठली लड्डू’ हा चित्रपट बनवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेता संजय मिश्रा अभिनीत ‘गुठली लड्डू’ या चित्रपटाचे फिल्म रिव्यू करणाऱ्यांनी देखील स्तुती केली आहे.
यूव्ही फिल्म्स आणि प्रदीप रंगवानी प्रस्तुत ‘लेट्स मीट’ चे दिग्दर्शन रवींद्र संधू (रिकी) यांनी केले आहे आणि प्रदीप रंगवानी निर्मित आहेत. अनिल बी अक्की यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून चित्रपटाचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग रवींद्र संधू (रिकी) यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे संगीत प्रिनी सिद्धांत माधव आणि रोहन & रोहन यांनी दिले आहे आणि नवीन त्यागी यांचे गीत प्रसिद्ध गायक जावेद अली, नकाश अझीझ आणि रोहन प्रधान यांच्या मधुर आवाजाने सजले आहेत. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अनिल बी अक्की आहेत. मेकर्स ने सांगितले की, चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग मुंबईत झाले आहे. 07 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट हिंदी भाषेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन