April 29, 2024

कात्रज,कोंढवा,बिबवेवाडीतील पाणीपुरवठा बुधवारी बंद

पुणे, १ मार्च २०२४ ः कात्रज कोंढवा रस्त्यावर कान्हा हॉटेल येथे जलवाहिनी दुरुस्ती व स्थलांतरित करणे, बिबवेवाडी येथे महेश सोसायटी चौकात जलवाहिनी स्थलांतरित करणे या कामासाठी बुधवारी (ता.६) दक्षिण पुण्यातील कोंढवा, इस्कॉन मंदिर, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे ः कोंढवा बुद्रूक, अप्पर इंदिरानगर परिसर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतिनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर, तळजाई झोनमधील पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, प्रकल्प सोसायटी, हस्तीनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडेन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाऊन, चैत्रबन वसाहत, अप्पर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग एक आणि दोन.